जिल्ह्यातील आज सकाळी आलेल्या पहिल्या टप्प्यातील अहवालात ३९ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ९१०४ वर गेली आहे.
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार परीक्षण केलेल्या ७८१ स्वॅबपैकी ३९ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ९१०४ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ५३५५ बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत ३६४ जणांचा मृत्यू झाला. तर ३३८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ११ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
शहरातील २१ रुग्ण
शहरातील २१ रुग्ण हे सादातनगर १, भवानीनगर १, क्रांती चौक १, राजनगर १, चित्तेगाव १, मिटमिटा १, बेगमपुरा १, केसरसिंगपुरा १, भीमनगर १, एन चार सिडको १, मिल कॉर्नर १, भोईवाडा, मिल कॉर्नर १, स्वामी विवेकानंदनगर ७, एन नऊ सिडको १, जयसिंगपुरा १ या भागातील रुग्ण आढळून आले आहेत.
ग्रामीण भागात ७ रुग्ण
ग्रामीण भागात ७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात तेली गल्ली, फुलंब्री ५, लासूर स्टेशन २ या भागातील कोरोनाबाधित आहेत.














